Saturday, March 19, 2011

मैत्रीण



यार, कधीकधी असं वाटतं की एकतरी नि:स्वार्थी मैत्रीण असावी.
लपुनछपुन नाही.. ओपन!!
बायको ऐवजी नाही, तर बायको सकट.
सुंदर आणि प्रेमळ बायको असतांना सुद्धा असं वाटणं चुक आहे का?
..आणि जर अशी मैत्रीण असलीचं, तर बायको तीचं तुमच्याशी असलेलं नातं समजुन घेउ शकेल?
खरं तर समजुतदारपणाचा मक्ता मैत्रीणीकडेच असतो.
तीच कायम रिसिव्हींग एन्ड ला असते.
पण समजा एखाद्या नाजुक क्षणी तिच्याही मनात वासना आली तर??
..की शेवटी नर आणि मादी हेच नातं खरं आहे???

1 comment:

  1. एक मुलगा आनी एक मुलगी कधिच खरे मित्र होवु शकत नाहि. हेच ह्या निसर्गाचे सत्य आहे.

    ReplyDelete