Sunday, April 17, 2011

झायीब आणि हानीया

झायीब आणि हानीया या दोन सुपर टॅलेंटेड पाकिस्तानी गायीका आहेत. त्यांचा ’चुप’ हा अल्बम पाकिस्तानात धुमाकुळ घालतोय.. असो, जास्त माहीती हवी असेल तर गुगल करा.

त्यांचं ’पैमाना बिदे" हा एक वेगळाच अनुभव आहे. मी हे गाणं ३० वेळा ऐकलं.. पुन्हा पुन्हा ऐकलं. सो, एन्जॉय ’पैमाना बिदे’.....Zeb and Haniya, Zebunissa Bangash and Haniya Aslam, chup

Saturday, March 19, 2011

मैत्रीणयार, कधीकधी असं वाटतं की एकतरी नि:स्वार्थी मैत्रीण असावी.
लपुनछपुन नाही.. ओपन!!
बायको ऐवजी नाही, तर बायको सकट.
सुंदर आणि प्रेमळ बायको असतांना सुद्धा असं वाटणं चुक आहे का?
..आणि जर अशी मैत्रीण असलीचं, तर बायको तीचं तुमच्याशी असलेलं नातं समजुन घेउ शकेल?
खरं तर समजुतदारपणाचा मक्ता मैत्रीणीकडेच असतो.
तीच कायम रिसिव्हींग एन्ड ला असते.
पण समजा एखाद्या नाजुक क्षणी तिच्याही मनात वासना आली तर??
..की शेवटी नर आणि मादी हेच नातं खरं आहे???

Friday, March 18, 2011

स्त्री-पुरुष इंटरेस्टिंग सर्व्हे


४०% स्त्रीयांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं

६३% स्त्रीयांना पुरुषांनी त्यांच्याकडे पाहीलेल आवडतं

८३% स्त्रीया इमोशनली विचार करतात

७३% पुरुषांना सुंदर स्त्रीयांची भीती वाटते

६७% स्त्रीयांचा विवाहसंस्थेवर विश्वास आहे

७१% पुरुष लग्नासाठी व्हर्जिनीटी हा निकष लावत नाहीत

५४% पुरुषांना लठ्ठपणा हा सेक्समधला अडसर वाटत नाही

६२% पुरुष बायकोचे/गर्लफ्रेंडचे मोबाईल तपासतात

Thursday, March 17, 2011

आय लव यु


’आय लव यु’ हे जादुचे शब्द म्हणण्याचा मूर्खपणा केलाय कधी?
जोडीदाराला, मित्रांना, मुलांना, आईवडीलांना.. अगदी आवडलेल्या कुणालाही..

की तो तुमचा स्वभावच नाही..
किंवा हे शब्द एखाद्या खास व्यक्तीसाठीच असतात असं तुम्हाला वाटतयं?

आता इतक्या उशिरा???
वय झालं आता...
अशक्य आहे यार

असं म्हणता???

मग आजच करा हा वेडेपणा! येस.. गो फॉर ईट!!

समोरचा तुम्हाला आधी वेड्यात काढेल.. तरीही.. लगे रहो!

ढगात जायच्या आधी एवढं कराच!!

Wednesday, March 16, 2011

बाजु

नवरा-बायकोनी माहीत्यीये का.. एकत्र राहीलं नाही पाहीजे

पुर्वीच्याकाळी राजघराण्यात कसं राजाचा महाल वेगळा असायचा, राणीचा वेगळा
मग राजा ठरावीक वेळाच राणीच्या महालात जाणार
राणी खास त्याच्या साठी तयार होणार
दोघांनाही एकमेकांची चांगली बाजुच दिसणार..

आजकालची राणी गाउन घालुन घरभर केसं सांडत फिरते
कधी नाक खाजवत बसते...

राजाही घरभर अंडरपॅंटवर फिरतो
नाकात बोटं घालत टीव्हीसमोर फतकल मारून बसतो
मोठ्याने पादतो...

होतं काय.. दोघांना एकमेकांची सामान्य बाजु दिसते

म्हणुन... नवरा-बायकोनी माहीत्यीये का.. एकत्र राहीलं नाही पाहीजे

Tuesday, March 15, 2011

लाइफ

आपली लाइफ नथींग आहे.. नथींग!!
पुण्याचे आयटी वाले जी मजा करतात त्यापुढे
साधारण घरच्या, साधारण दिसणाऱ्या मराठी मुली आणि मुलं..
७-८ च्या गृप मधे सुमोत निघतात..
अलिबाग किंवा गणपतीपुळे..
सोबत बकार्डी.. मेल/फिमेल कंडोम्स.. क्रेडिट कार्ड्स..
बरं हे सगळे एकमेकांना ओळखतात वगैरे.. असं काहीही नाही..
नियम एकच.. नो कॅमेरा प्लिज..
ही माझी.. ती तुझी.. असली भानगड नाही..
सगळा खुला मामला.. अर्थात ’योग्य’ ती काळजी घेउन----

Thursday, March 10, 2011

टकीला

काल टकीला घेतली.. ५ शॉट
लई भारी मेक्सिकन दारु आहे राव..
सगळ्यात महाग दारुचं गिनिज वर्ड रेकॉर्ड टकीलाच्या नावावर आहे म्हणे
ही ’निट’ घेतात.. ज्याला शॉट म्हणतात
ह्या साठी खास टंबलर/शॉट ग्लास असतातआधी बोटाने मिठ चाटायचं
टकीलाचा शॉट घ्यायचा..
ताज्या लिंबाची फोड चोखायची..
बास्स.. विमान हवेत..

tequila shots, thasaa, thasaa.blogspot.com